लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १७ डिसेंबर: गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या राजगाटा चक च्या जंगलात नरभक्षक वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृतक महिलेचे नाव अनुसया शामराव मोंगरकर (५८) असून राजगाटा चक या गावातील राविवासी आहे. सदर मृतक महिला आज दुपारच्या सुमारास झाडण्याच्या काळ्या गोळा करण्यासाठी वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रं. १ मध्ये जाऊन वनात झाडण्याच्या काळ्या गोळा करीत असतांना अचानक दबा धरुन बसलेल्या नरभक्षक वाघाने महिलेवर हल्ला केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना प्राप्त होताच गडचिरोली पोलीस विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्यासह वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून महिलेचे मृतदेह शविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
ओबीसी समाजानी निवडणुकीवर बहिष्कार न करता भाजपाला मतदान करू नये – मंत्री छगन भुजबळ