एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, घरगुती गॅस ‘जेसै थे’

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 1ऑगस्ट 2023 ; भारतीय तेल कंपन्यांनी 1 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या  किमती अपडेट केल्या आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किंमतींत बदल करण्यात आला आहे. यावेळी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. या बदलामुळे देशाची राजधानी नवी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 1680 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी करण्यात आलेल्या वाढीसह व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1780 रुपयांवर पोहोचली होती.

घरगुती गॅसच्या दरांत मार्चपासून कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. मार्चमध्ये 14.2 किलो घरगुती एलपीजीच्या किमतींत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 1103 रुपये प्रति सिलिंडर आहे. तर मुंबईत एलपीजी सिलिंडरचा दर 1102.50 रुपये इतका आहे. तर कोलकात्यात 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये प्रति सिलिंडर विकला जात आहे.

कोलकातामध्ये LPG 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 93 रुपयांनी कमी झाली असून आता व्यावसायिक सिलिंडर 1802.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 1640.50 रुपयांना हा सिलिंडर विकला जाणार आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजी 19 किलो सिलेंडरची किंमत 1852.50 रुपयांवर पोहोचली आहे, जी 4 जुलै रोजी 1945 रुपयांपर्यंत वाढली होती.

हे पण वाचा :-

 

Commercial CylinderDomestic LPG CylindersLPG Cylinders