FastTag अनिवार्य, केंद्राचा निर्णय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क :- मोदी सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यात १ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा नियम १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर खरेदी झालेल्या वाहनांसाह M आणि N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.

विना फास्टटॅग वाहनांनी फास्टटॅग मार्गिकेचा वापर केला तर वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येतो. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्यांवर फास्टटॅग लेन सुरू झालंय. या योजनेमुळे टोलनाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि झटपट होतो.

सुरुवातीला टोल नाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

fast tag