सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण

देशात 10 दिवसांत 15000+ मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 23 एप्रिल:– सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होतं आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, कोरोना स्थिती भयावह बनत चालली आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना विषाणूच्या आकडेवारीनं विक्रमी झेप नोंदली आहे. गुरुवारी देशात 3.3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) सलग दुसऱ्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांपार गेला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही राज्यात कोरोना लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. तर काही राज्य कोरोना लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाला घरात बंद होण्याची वेळ येत आहे.

देशात सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. असं असताना गेल्या 17  दिवसांपासून देशात दररोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या आढळत आहे. दुसरीकडे, देशात मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून दररोज 1 हजाराहून अधिक कोविड रुग्णांचा मृत्यू होतं आहे. गेल्या 10 दिवसांत 15 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 67,013 नवीन रुग्ण आढळली आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ उत्तर प्रदेशात 34 हजार 379, केरळमध्ये 26 हजार 995, दिल्लीत 26 हजार 169 आणि कर्नाटकात 25 हजार 795 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. छत्तीसगडमध्ये 16 हजार 750 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. तर राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि आंध्र प्रदेश याठिकाणीही 10 हजार ते 15 हजार दरम्यान कोरोना रुग्ण आढळत आहेत.

amit shahacovid 19covid spred in indiamodimodi fail