‘युज आणि थ्रो’ पॉलिसी चांगली नाही – नितीन गडकरी

गडकरींचा भाजपला अप्रत्यक्ष टोला...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर 29 ऑगस्ट :- राजकारण हे समाजकारणाचे व्यापक स्वरूप आहे. असे लोकमान्य टिळक म्हणत. मात्र सध्याचे राजकारण हे सत्तेच्या खुर्चीभोवती फिरत आहे. अशा परिस्थितीत भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करताना एका कार्यक्रमाच्या दरम्यान ‘ युज अँड थ्रो ही पॉलिसी चांगली नाही, ‘ हे विधान त्यांनी केले. हे विधान म्हणजे भाजपच्या सध्याच्या राजकारणाला अप्रत्यक्ष टोला असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

उगवत्या सूर्याची पूजा करू नका, हा सल्ला देतानाच कोणाचे वाईट दिवस असो किंवा चांगले दिवस असो एकदा कोणाचा हात धरला की त्याची साथ सोडू नका” हे सांगायला ते विसरले नाहीत. भाजपच्या संसदीय मंडळातून काढून टाकल्या नंतर गडकरी नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. तसेच ते काँग्रेस मध्ये प्रवेश करतील असेही काहीजणांचे मत होते. मात्र मी विहिरीत उडी घेईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही असे सांगून त्यांनी ह्या चर्चेला पूर्णविराम दिला.

हे देखील वाचा :-

वर्ध्यात फोडले एटीएम, 22 लाखाची रोकड लंपास

 

Amit shahbjpIndian politicsJPnaddamodi governmentNITIN GADKARI