भाजपा महिला आघाडी तर्फे उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन 

क्रूर हत्यारा आफताब ला फाशीच द्या !  -  वंदनाताई शेंडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ब्रम्हपुरी, दि. २४ नोव्हेंबर : संतांची तसेच महापुरूषांची भूमी असलेल्या भारत देशाच्या भूमीत. शौर्य पराक्रम गाजवणाऱ्या वीर पुरूषांच्या भूमीत. सदैव स्त्रियांचा मान सन्मान ,प्रतिष्ठा प्राणपणाने जपली जाते. आणि म्हणूनच स्रियांप्रती होणार्‍या गुन्हयांकडे गांभीर्याने लक्ष देऊन, या अमानवी शक्तींना आळा घालण्यासाठी महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना जबर शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणून श्रद्धा वालकर हत्याकांडातील आफताबला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी भाजपा महिला आघाडीच्या वतीने वंदनाताई अरुणजी शेंडे यांच्या नेतृत्वात तसेच प्राचार्य अरुणजी शेंडे तालुकाध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी, प्रा. रामलाल महादेव दोनाडकर माजी सभापती तथा तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका तसेच तनय अतुल देशकर जिल्हा सचिव-भाजयुमो चंद्रपूर जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांचे सह यांचे मार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन मुंबई, यांना निवेदन देण्यात आले.

वेळीच योग्य कार्यवाही न केल्यास भाजपा महिला आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.निवेदन देताना भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदनाताई अरुणजी शेंडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ. रश्मीताई पेशने, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा तथा माजी जि प सदस्या दिपालीताई मेश्राम,भाजपा महिला आघाडीच्या चंद्रपूर च्या जिल्हा सचीव मंजीरीताई राजणकर, भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या सदस्या शीलाताई गोंधोळे , ब्रम्हपूरी नगरपरिषदच्या नगरसेविका पुष्पाताई गराडे,

माजी पंचायत समिती सदस्या उर्मिलाताई प्रेमलालजी धोटे, सेठिये ताई, विभाताई सुभेदार इ, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

दरोड्यांचा उद्देशाने आलेल्या आरोपीला शिताफीने अटक

खूनाच्या गुन्हयातील फरार आरोपीना 48 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक