खूनाच्या गुन्हयातील फरार आरोपीना 48 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नांदेड,  दि. २४ नोव्हेंबर : 21/11/2022 रोजी प्रॉपर नांदेड शहरात प्रेमी युगलातील मुलाचा खुन झाला होता. त्यामध्ये पोलीस ठाणे विमानतळ येथे गुरनं. 398/2022 कलम 302, 364, 341, 143, 147, 148, 149 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते.

पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी पथके तयार करुन नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते.

पोलीस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर, स्था. गु. शा. नांदेड यांनी नमुद गुन्हयातील आरोपी शोध संबंधाने घटनास्थळी जावुन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन, फुटेज गुप्त बातमीदारांना दाखवुन आरोपीची ओळख पटविली असता, त्यात मुख्य आरोपी शायबाज खान पि. एजाज खान रा. पक्की चाळ, नांदेड हा असल्याचे समजले त्यावरुन स्थागुशाचे पथकाने त्यास ताब्यात घेवुन इतर आरोपी व गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, सदरचा गुन्हा त्यांनी व त्याचे इतर 10 ते 15 साथीदारांनी मिळुन गुन्हा केल्याचे सांगीतले.

त्यावरुन स्थागुशा कडुन आज दिनांक 23/11/2022 रोजी निष्पन्न झालेल्या आरोपीतापैकी 1) शायबाज खान पि. एजाज खान वय 24 वर्षे रा. पक्की चाळ, नांदेड 2) महमद सदाम पि. महमद साजीद कुरेशी वय 20 वर्षे रा. मिलगेट नांदेड 3) महमद उसामा महमद साजीद कुरेशी वय 20 वर्षे रा. मिलगेट, सोमेशकॉलनी नांदेड 4) शेख अयान शेख इमाम वय 20 वर्षे रा. आसरानगर नांदेड 5) सोहेलखान साहेबखान वय 19 वर्षे रा. सुदंरनगर नांदेड 6) सयद फरान ऊर्फ साहील सयद मुमताज वय 19 वर्षे रा. मोमीनगल्ली मुखेड ह. मु.आसरानगर नांदेड 7) उबेद खान पि. युनुसखान वय 23 वर्षे रा. चौफाळा, नांदेड यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगीतले आहे. त्यावरुन मिळुन आलेल्या आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस ठाणे विमानतळ गुरनं. 398/2022 कलम 302, 364, 341, 143, 147, 148, 149 भा दं वि गुन्हयात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, सपोनि/पांडुरंग माने, पोउपनि /सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, सपोउपनि / संजय केंद्रे, पोह/ गंगाधर कदम, पो ना / अफजल पठाण, पो कॉ / विलास कदम, तानाजी येळगे, मोतीराम पवार, चा पो कॉ/ हेमंत बिचकेवार पोह / दिपक ओढणे, राजु सिटीकर महेश बडगुजर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

हे देखील वाचा : 

विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

 

हनुमान मुर्तीच्या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश विसापूर येथील घटना