BIG BREAKING : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीस मंत्रिमंडळाबाहेर राहणार..?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ३० जून : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून ते राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यानंतर अखेर आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतल्यानंतर याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. तसेच आज केवळ एकनाथ शिंदेयांचाच शपथविधी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे असेही फडणवीस यांनी जाहीर केले आहे. 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्चन्या यालयाच्या­ निर्णयानंतर रात्री मुख्यमंत्रीपद आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज शपथ घेणार आणि भाजप सत्तेत सहभागी होणार असून आपण सरकार बाहेर राहणार असल्याचे खुद्द फडणवीस यांनीच जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस उपमुख्य मंत्री पदाची शपथ घेतील की, प्रदेशाध्यक्ष पदायाची धुरा सांभाळतील याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Debendra FadnavisEknath Shindelead news