बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना अटक; एक फरार

वर्ध्याच्या वनविभागाची मोठी कारवाई .. वनविभागाने चामडे केले जप्त..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वर्धा दि, १४ डिसेंबर : वर्धा शहराच्या मुख्य बाजारपेठात बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना वन विभागाने चौघांना रंगेहात पकडून आरोपींच्या मुसक्या  आवळण्यात वन विभागाला मोठे यश आले आहे , आरोपीकडून बिबट्याचे संपूर्ण चामडे जप्त करण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. यात एक जण फरार झाला आहे.

वर्धा शहराच्या मुख्य बाजारपेठ येथील महादेवपुरा येथे आंबेडकर उद्यानजवळ बिबट्याच्या चामड्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. मध्यरात्री  वनविभागाने सापळा रचून तस्करी होताना आरोपींना रंगेहात पकडले.

बिबट्याच्या चामड्याचा 30 कोटी रुपयात सौदा झाल्याची माहिती आहे. बिबट्याच्या चामड्याच्या तस्करीत एकूण 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. एक आरोपी फरार असल्याची वनविभागाने सांगितले आहे. बिबट्याच्या चांमड्यांची तस्करी प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तस्करी प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

हे देखील वाचा,

वसईला निघालेली मुलगी वाट चुकून गेली जळगांवला !

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

तीन गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह दोघांना अटक…

Aditya ThakarayClead stori narendra modi M Uddhav Thakarey