११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नंदूरबार, दि. १० फेब्रुवारी : नंदुरबार जिल्हयातिल शहादा शहरात ११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत राहणाऱ्या ज्वेलर्सच्या दुकानात गहाण ठेवलेले सोने नाजिम रहिम बागवान (३२) हा शहादा सोडविण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला पकडून तपासणी केली असता त्याच्या ताब्यात १०० रुपयांच्या १११ बनावट नोटा असा एकूण ११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.

त्याला बनावट नोटा असल्याची माहिती असतानाही त्याने बनावट नोटा बाळगल्या. याप्रकरणी पो.ना. विकास कापूरे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात नाजिम रहिम बागवान रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा यांच्या विरुद्ध भादवी कलम 489 (ब), 489 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत करीत आहेत.

हे देखील वाचा : 

हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप

बालविवाह रोखल्याने मुलाकडील वऱ्हाडी विवाह न करताच परतले रिकामे हाताने…

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल

 

lead news