गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ४ किमी अंतर डोलितून पायपीट..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सरकारची लक्तरे वेशीवर ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघरमध्ये गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ४ किमी अंतर  डोलितून पार करावं लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे …

पालघर दि 23 एप्रिल : मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी तब्बल ४ किमी अंतर डोलितून पार करावं लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

त्यामुळे एकीकडे देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना दुसरीकडे दुर्गम भागात दळणवळण आणि आरोग्य सेवेच्या अभावामुळे रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येत आहे.

मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाडा येथील दुर्गा भोये या महिलेला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्या . मात्र गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने रस्त्यापर्यंत नेण्यासाठी गरोदर महिलेला चार किलोमीटर पायपीट करत डोलितून न्यावं लागल. पालघर मध्ये आरोग्य आणि दळणवळण साधनांचा अभाव नेहमीच समोर येतोय .

मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असताना या दुर्गम भागात अद्याप मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने लहान मुलं महिला आणि वृध्द रुग्णांना आजही डोलीचा आधार घ्यावा लागत आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून येत आहेत.

Clead news M Uddhav ThakareyHealth Minister Rajesh Tope