प्रधान मंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी) मेळाव्याचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नांदेड, दि. ११ नोव्हेंबर : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मा.आयुक्त डॉ सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ,उपायुक्त भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ११/ ११/२०२२ रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड कार्यक्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया नवा मोंढा शाखेमध्ये SBI बँकेच्या वतीने पीएम स्वनिधी अंतर्गत नांदेड शहरातील मंजूर झालेले परंतु वितरित न झालेल्या फेरीवाल्यांचे कर्ज प्रकरणांचे कागदपत्रे (KYC) संकलित करून कर्ज वितरित करणे बाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..

या वेळी एकूण १६८ लाभार्थ्यांचे कागदपत्रे संकलित करण्यात आले. संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच कर्ज रक्कम बँकेमार्फत वितरित करण्यात येणार आहे. या शिबिरास अनिल गचके व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, कुणाल जगताप मुख्य व्यवस्थापक क्रेडिट तसेच महानगरपालिका नांदेड च्या वतीने अशोक सूर्यवंशी , चंद्रकांत कदम, अमोल देशपांडे त्याचप्रमाणे गजानन बागल,अंकुश वाघमारे,शाकेरा बेगम, कीर्ती ओपळे, गजानन शिंदे व स्टेट बँक ऑफ इंडियाचे रुपेश खोत, प्रबोधन भावसार, अमीत मुंजेकर इत्यादी उपस्थित होते.

मनपा हद्दीतील सर्व पथ विक्रेते याना आवाहन करण्यात येते की pm svanidhi योजनेचा लाभ घेण्यासाठी Day- Nulm विभागाशी संपर्क साधावा.

हे देखील वाचा: 

जितेंद्र आव्हाड हे छत्रपतींच्या अपमान करणार्‍यांना जाब विचारल्याने जेलमध्ये जात असतील तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे- खा.सुप्रियाताई सुळे

महाडिबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी प्रलंबीत शिष्यवृत्ती बाबत

 

ManagementPMSwanidhi