पुन्हा वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी.!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरदीप लोखंडे,

ब्रम्हपुरी दि.१४ जून: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातल्या हळदा गावाशेजारील जंगलात पुन्हा एकदा वाघाने केलेल्या हल्यात शेतकऱ्याचा बळी गेला आहे. देविदास परसराम कांबळी ( ४८ ) या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे एक दिवस अगोदर याच गावातील राजू कांबळी वय ४२ या शेतकऱ्याचा त्यांची पत्नी आणि मुला सोबत रानात जात असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता . त्यामुळेही नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्मााण झाले आहे.

हळदा गावातील देविदास शेतकरी शेतावर जात असताना झुडपात लपून बसलेल्या वाघाने देविदास वर अचानक हल्ला केला. तेव्हा देविदास सोबत असलेल्या सहारे नामक जोडीदाराने मृतकला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु ते त्याला यश आले नाही. देविदासला ठार केल्यानंतर वाघाने सहारे या ईसमावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने मोठ्या हिमतीने जागेवरून पळ काढल्यामुळे वाघाच्या तावडीतून बचावला .नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. नाहीतर त्याला सुद्धा वाघाचा बळी ठरावे लागले असते.

दिवसेंदिवस होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांमुळे हळदा गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रोज वाघाचे माणसावर तर कधी प्राण्यावर  हल्ले होत असल्यामुळे शेतकरी आणि गावकरी मोठ्या चिंता करत असून वन विभागाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला जात आहेत. सध्या गुराख्यांना खुल्या जागेत गाई-ढोरं, शेळ्या चारणे सुद्धा कठीण झाले आहे. ऐन शेतीचा हंगाम सुरू झाला असून अशा परिस्थितीत शेतीच्या कामासाठी शेतावर कसे जावे या विचाराने शेतकऱी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे या नरभक्षी वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्याकडे केली आहे.

घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वन विभागातील वरिष्ठ अधिकारी  व पोलीस अधिकारी, आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

आतातरी या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा उद्रेक होईल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या गंभीर बाबीची प्रशासन कशाप्रकारे दखल घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा,

आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार

 

Aditya ThackareyClead news M Uddhav Thakareymla vijay wadetiwar dm ajay gulhanepccfsunil limaye