“या” शहरातील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार : राज्य सरकारचा मोठा निर्णय

सरकारच्या निर्णयाचे केले मनसे आमदार राजू पाटील यांनी केले अभिनंदन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

डोंबिवली :  एमआयडीसीमध्ये एकूण ५२५ औद्योगिक भूखंड आहेत. तर ६१७ निवासी भूखंड आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रहिवासी भागांपासून प्रामुख्याने ५० मीटर अंतरावर असलेले १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. हा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान कामा संघटनेने याला ठाम विरोध केला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील आमदार म्हणून निवडून आल्यावर प्रदूषणकारि कारखाने हे शिफ्ट झाले पाहिजे होते अशी मागणी होती तसेच सरकार ने घेतलेल्या निर्णयाचे मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील अभिनंदन केले आहे. व या शिफ्ट झालेल्या कंपन्यांच्या जागेचा कमर्शियल साठी उपयोग करावा. आय टी हब व्हायला हवा,ग्रामीण भागात ग्रोथ सेंटर टाकला आहे त्याचा काही पार्ट चा रिजेवेशन या भागावर टाकाव आणि ग्रामीण मधील ग्रोथ सेंटरच रिजेवेशन काढून टाकावे अशी मागिनी देखील मनसे आमदार पाटील यांनी केली आहे.

हे देखील वाचा : 

चक्क! मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवत कामगारांचे आंदोलन

धक्कादायक! शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १४ फेब्रुवारीला अनावरण

 

lead news