रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी त्याचा घरुन घेतले ताब्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई ४ नोव्हेंबर :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. २०१८ साली झालेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अन्वय नाईक यांच्या पत्नीने गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यांनतर पोलीसांनी कारवाई करत अर्णब यांना ताब्यात घेतले आहे. कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी ३०६ कलमाअंतर्गत त्यांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे अन्वय नाईक प्रकरण ?

5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता.अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

रायगडमधील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला दोन वर्षं झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आणि न्यायाची मागणी केली.त्यावेळी काँग्रेससह विविध पक्षांनी हा मुद्दा उचलला आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

arnab gosami arrestbjp vs maha vikas