लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीड, दि. १० फेब्रुवारी : जिल्ह्यातील लव्हुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
केज तालुक्यातील लव्हुरी येथील अतिक्रमण धारकांनी १९८० पासून गायरान जमिन कसत असलेला पुरावा जिल्हाधिकारी बीड यांना दिला आहे. मात्र त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे ते काम रद्द करण्याची मागणी करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाई कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे देखील वाचा :