होमिओपॅथिक औषधांचा वापर करून गोड मिरचीची लागवड…

पारंपारिक शेती, रासायनिक शेती, सेंद्रिय शेती नंतर; आता होमिओपॅथिक शेती... बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात गोड मिरचीची लागवड..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बारामती, दि. ७ फेब्रुवारी : बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात होमिओपॅथीच्या औषधाचा वापर करून चक्क गोड मिरचीची लागवड करण्यात आली आहे. त्याही विविध रंगाच्या आकारात. आतापर्यंत आपण पारंपारिक शेती, रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती पाहिली आहे. मात्र आता होमिओपॅथिक औषधांचा वापर करून गोड मिरचीचे यशस्वी उत्पादन घेता येते हे सिद्ध झाले आहे.

शेतीमध्ये सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करणे जिकिरीचे असल्याचे शेतकरी मानतात. मात्र याला पर्याय शोधलाय तो म्हणजे शेतीमध्ये होमिओपॅथी औषधाचा वापर करून गोड मिरचीची लागवड बारामती कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याचे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी सांगितले आहे.

ही मिरची पूर्णपणे विषमुक्त असून याचे मार्केटिंग मोठमोठ्या हॉटेलमध्ये होते. ही गोड मिरची ४० ते १०० रुपये किलो विकली जाते.. एक एकर मिरची लागवडीसाठी शेडनेट सह साधारण दीड लाखापर्यंत खर्च येतो. यात तीस ते पस्तीस टन मिरची चे उत्पादन मिळू शकते. शेतकऱ्यांना खर्च वजा जाता एकरी सहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. असे शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : 

नववधूची पाठवणी सजविलेल्या बैलगाडीतून!

धक्कादायक ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अनैतिक संबंधातून महिला करायची ब्लॅकमेल

धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणाऱ्या तडीपार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

 

 

 

lead news