लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड दि,३१ ऑगस्ट : कोरोना महामारीच्या काळात बीड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय सेवक अहोरात्र सेवा देत लाखो रुग्णांचे जीव वाचवित होते. तर दुसरीकडे कोव्हीड सेंटर्सकडुन रुग्णांची मोठी आर्थिक लूट होत होती. दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील शासनमान्य खासगी कोव्हीड सेंटर्सकडून नागरिकांची कोट्यावधी रुपयांची लूट झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाबुराव पोटभरे यांनी केलाय.

 विशेष म्हणजे पोटभरे हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. आता थेट पोटभरे यांनीच जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केल्याने धनंजय मुंडेंच्या विश्वासाहर्तवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कोव्हीड  सेंटर्स चालकांचे तात्काळ ऑडिट करा आणि मृत रुग्णांचा देखील अहवाल सादर करून दोषींवर कडक कारवाई करा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा बाबुराव पोटभरे यांनी दिलाय.

नियोजन समितीचे सदस्यच पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे गंभीर आरोप करत असल्याने पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या डोखेदुखीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

हे देखील वाचा,

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य ‘स्वयंरोजगार मेळावा’ संपन्न

वणी (खुर्द) येथील पिडितांच्या न्यायासाठी ऑल इंडिया पँथर उतरली रस्त्यावर

Clead stori M Uddhav Thakareydhanjay munderajesh tope