“या” महिन्यात १० टक्क्यांपर्यंत वाढणार इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वृत्तसंस्था, ९ जानेवारी : नव्या वर्षात जवळपास सर्वच गोष्टी आधीच्या तुलनेत महागल्या आहेत. महागाई वाढण्यास कोरोनाचा नवा वेरिएंट ओमिक्रॉन कारणीभूत ठरत आहे. कार, खाण्या-पिण्याच्या सामानानंतर आता AC, फ्रीजच्या किंमती वाढल्या आहेत.

इलेक्ट्रिकल वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कच्चा मालाच्या महागाईमुळे एसी, फ्रीजच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याशिवाय वॉशिंग मशीनच्या किंमती जानेवारी ते मार्चदरम्यान ५ ते १०  टक्क्यांनी वाढू शकतात.

एसी, फ्रीज बनवणाऱ्या कंपन्या Panasonic, LG, Haier ने आपल्या सामानच्या किंमतीत वाढ केली आहे. तर Sony, Godrej या तिमाहीच्या अखेरीस दर वाढवू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायंसेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायंसेस बनवणाऱ्या कंपन्या जानेवारी ते मार्चदरम्यान ५.७ टक्क्यांपर्यंत रेट वाढवू शकतात. काही कंपन्यांनी आधीच रेट वाढवले आहेत.

परदेशातून मालाची वाहतूक आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढ यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत वाढ होत असल्याची माहिती Haier अप्लायंसेस इंडियाच्या अध्यक्षांनी दिली.

Haier कंपनीने एसी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या दरात ३ ते ५ टक्क्यांची वाढ केली आहे. Panasonic ने एसीच्या किंमतीत ८ टक्क्यांची वाढ केली आहे.

कधी कमी होतील दर?

आता दर वाढत असताना भविष्यात घट होण्याची शक्यता असू शकते. परंतु भविष्यातील घट डिमांड आणि सप्लायवरही अवलंबून आहे. जर इलेक्ट्रॉनिक्स सामानाची मागणी कमी झाली आणि कच्च्या मालाचे दर कमी झाले तर इलेक्ट्रिकल वस्तूंची किंमत एप्रिल-मेपर्यंत कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

१ कोटी ६४ लाखांचा घोटाळा : एफडीसीएमचा तत्कालीन विभागीय व्यवस्थापक जाळ्यात

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

आरोग्य कर्मचारी संपावर!…

 

electronicslead news