पावसाचा मुक्काम वाढला ! राज्यात आणखी पाच दिवस मुसळधार पाऊस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. १६ सप्टेंबर :  भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून पुढील पाच दिवसांसाठी धुवांधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली आहे. उत्तर प्रदेशात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पाऊस होत आहे. आज ज्या प्रमाणात पाऊस झाला त्यापेक्षा कमी पावसाची नोंद उद्या होण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देखील जारी केले आहेत.

ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेज अलर्ट दिला आहे. तर, ठाणे, पुणे आणि रत्नागिरीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना १७ सप्टेंबर पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. १८ ते २० सप्टेंबर या काळात प्रामुख्यानं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं या भागातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केले आहेत.

हे देखील वाचा : 

गद्दारी शब्द त्यांच्या रक्तातच – राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र गुजरात पेक्षा मागे पडल्याची देवेंद्र फडणवीस यांना खंत

कॉमन ड्रेस कोडची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

 

lead newsmaharashtra state