खासदार भावना गवळी हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल

भाजपा महिला मोर्चा कडून यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, दि. २३ मार्च : यवतमाळ-वाशिम मतदार संघाच्या भावना गवळी खासदार आहेत. मात्र गवळी ह्या सहा महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार यवतमाळ शहर पोलिसात भाजपा महिला मोर्चा कडून दाखल करण्यात आली आहे. या आधी सुद्धा भाजपाकडून भावना गवळी हरविल्याची बॅनरबाजी करण्यात आली होती.

आता मात्र भाजपाच्या वतीने चक्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष येत्या काळात उद्भवणार हे निश्चित.

हे देखील वाचा : 

गडचिरोलीतील विशेष आहार योजनेचे यश

पोलीसांची अशीही माणुसकी

सुरक्षा वाढविताच वर्धा कोर्टात प्रवेश करणाऱ्याकडे सापडला चाकू

bhawana gawalilead news