कोल्हापुरात लाखो रुपयांचा दीड हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं तीन कंपन्यांवर छापा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 

 कोल्हापूर ०३ नोव्हेंबर : अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं कोल्हापुरातील तीन कंपन्यांवर एकूण चार ठिकाणी छापा टाकत सुमारे २० लाखाचा दीड हजार किलो भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले आहेत.

 

 

शिरोळ तालुक्यातील या सर्व आस्थापना असून यावर छापा टाकून त्यांचा काळाबाजार उघड केला आहे.ऐन दिवाळीत मिठाईची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यातच बनावट खव्याचा काळाबाजार उघड केल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.या कारवाईत तीन ठिकाणी जवळपास दीड हजार किलो खवा जप्त करण्यात आला आहे. तर २० लाखांहून अधिकचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र मिठाईची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. अशातच मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं भेसळयुक्त खवा बनवला जात असल्याची अन्न आणि औषध प्रशासनाला माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे इथल्या शिरोळ तालुक्यातल्या शिवरत्न मिल्क अँड मिल्क ऍग्रो प्रॉडक्ट, अमवा मिल्क अँड मिल्क एग्रो प्रॉडक्ट, गणेश मिल्क प्रॉडक्ट या आस्थापनांवर छापे टाकण्यात आले.या ठिकाणी भेसळयुक्त खवा बनवला जात असल्याचं समोर आलं.यावेळी तीन आस्थापनांवर टाकलेल्या छाप्यात जवळपास दीड हजार किलो भेसळयुक्त खवा आणि एकूण २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाची कोल्हापुरातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाच्या दक्षता आणि गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर तसंच अन्न सुरक्षा अधिकारी शिर्के आदींच्या पथकानं केली.

हे देखील वाचा,

मुक्या जनावरांंवर असंही प्रेम की, त्यांच्या हाकेवर मागे येतात अनेक गाई

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्न पदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग घेणार विशेष खबरदारी

सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

CM Uddha ThakarayFood and Drug Administrationkolhapur