कोरोनाच्या मृत यादीतील एक व्यक्ती जिवंत, प्रशासनाचा गोंधळ चव्हाट्यावर!

- व्यक्तिलाच विचारलं कोरोनाने मयत तुमचे कोण . - यादीत नाव पाहून जिवंत माणसाला धक्काच बसला.. - व्हायरल होणारी 216 लोकांची यादी बोगस?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड दि ,२५ डिसेंबर :- कोरोना काळात मृत्यू झालेल्या यादीतील एक व्यक्ती जिवंत आढळला आहे. जिवंत व्यक्तीचा समावेश मृतांच्या यादीत असल्याचा प्रकार अंबाजोगाईत उघडकीस आला आहे. अंबाजोगाईच्या प्रशांतनगर भागातील नागनाथ काशिनाथअप्पा वारद हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते

त्यादरम्यान त्यांच्यावर उपचार होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र त्यांचे नाव थेट मृतांच्या यादीत आल्याने ते पुरतेच गोंधळून गेले. दरम्यान अंबाजोगाईच्या कोव्हीड सेंटरमध्ये परळीचे नागनाथ विश्वनाथ वारद हे 74 वर्षीय व्यक्ती देखील उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र दोघांचेही नाव आणि आडनाव एक असल्याने, प्रशासनाकडून मृतांच्या यादीत या दोघांनाही मृत दाखविल्याने काही काळ गोंधळ उडाला. शिवाय सध्या व्हायरल होणारी एक यादी देखील बोगस असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान या प्रकाराने आरोग्य प्रशासनातील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अंबाजोगाईच्या कोव्हीड सेंटरमध्ये परळीचे नागनाथ विश्वनाथ वारद हे  ७४ वर्षीय व्यक्ती देखील उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र दोघांचेही नाव आणि आडनाव एक असल्याने, प्रशासनाकडून मृतांच्या यादीत या दोघांनाही मृत दाखविल्याने काही काळ गोंधळ उडाला. शिवाय सध्या व्हायरल होणारी एक यादी देखील बोगस असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान या प्रकाराने आरोग्य प्रशासनातील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान आज  कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत देण्यासाठी शासनाकडून मृत व्यक्तीच्या नावाची खातरजमा करणे सुरू आहे आणि याच कामांमध्ये अंबाजोगाई शहरात चक्क २१६ जिवंत माणसांचा समावेश हा कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या यादीत करण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला गेला.

हे देखील वाचा,

ओमिक्रॉनचा धोका; राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागू, राज्य शासनाचे नवे निर्बंध

आपली गुलामगीरी बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्षकरून घालवली, त्यांची आठवण आणि साक्ष आपल्या कृतीतुन दाखवा -आनंदराज आंबेडकरांचे क्रांतीभुमीतुन अवाहन

ओमिक्रॉनचा धोका; राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागू, राज्य शासनाचे नवे निर्बंध

 

lead newsCM Uddha Thakapravin darekarray