सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र सफारीचा घेतला आनंद

सचिन तेंडुलकर यांनी हे पत्र जारी करत ताडोबातील वन व वन्यजीव व्यवस्थापनाची केली प्रशंसा 
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर 20 फेब्रुवारी :- चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र दर्शनासाठी पोचलाय क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, पत्नी अंजलीसह ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या मदनापुर प्रवेशद्वारातून त्याने सफारीचा घेतला आनंद, सचिन ने जारी केलेल्या एका पत्रातून ताडोबात पाच वाघ पाहिल्याचे केले नमूद ,या पत्रात त्याने ताडोबातील उत्तम व्याघ्र व्यवस्थापनाचे केले कौतुक , ताडोबातील वनरक्षक -कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळेच ताडोबा सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प ठरला असल्याची दिली पावती, ताडोबात व्याघ्रदर्शन हमखास होण्यासाठी इथले कर्मचारी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल व्यक्त केले समाधान, अंजली तेंडुलकर यांच्यासह सचिन तेंडुलकर यांनी हे पत्र जारी करत ताडोबातील वन व वन्यजीव व्यवस्थापनाची केली प्रशंसा.

सचिन तेंडुलकर चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र दर्शनासाठी पोचलाय. पत्नी अंजलीसह त्याने ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या मदनापुर प्रवेशद्वारातून सफारीचा आनंद घेतला. सचिनने जारी केलेल्या एका पत्रातून ताडोबात पाच वाघ पाहिल्याचे नमूद केले आहे. या पत्रात त्याने ताडोबातील उत्तम व्याघ्र व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. ताडोबातील अधिकारी- वनरक्षक -कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळेच ताडोबा सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प ठरला असल्याची पावती त्याने दिली आहे. ताडोबात व्याघ्रदर्शन हमखास होण्यासाठी इथले कर्मचारी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल त्याने समाधान व्यक्त केले. अंजली तेंडुलकर यांच्यासह सचिन तेंडुलकर यांनी हे पत्र जारी करत ताडोबातील वन व वन्यजीव व्यवस्थापनाची प्रशंसा केली आहे. सचिन आपल्या कुटुंबासह याआधी देखील ताडोबात आला असून हे त्याचे फेवरेट डेस्टिनेशन असल्याचे सांगितले आहे.

हे पण वाचा :-

anjali tendulkarjangal safarisachin tendulkartadoba andhari projecttiger park