अवैध रेतीचे वाहतूक करणाऱ्या ३५ डंपरसह २० कोटीचा मुद्देमाल जप्त.

पोलीस अधीक्षक डॉ.हरी बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लोढा यांची धडक अमरावतीत  कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अमरावती, दि. ८ नोव्हेंबर:-

पावसाळा संपताच शहरात तसेच ग्रामीण भागात बांधकामाना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्यामुळे रेतीची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. ज्या व्यावसायिकांनी रेती साठवून ठेवली होती  त्यांनी सदर रेती दाम दुप्पट भावाने विक्री केली आता दामदुप्पट देवूनही रेती मिळत नाही.आणि रेतीची लिलाव प्रक्रिया रखडली आहे .

मात्र दुसऱ्या राज्यात अडचण नसल्याने राजरोसपणे क्षमतेपेक्षा जास्त अवैध रेती मध्यप्रदेशमधून महाराष्ट्राच्या वरूड, अमरावती, परतवाडा, अकोला यासह इतर भागामध्ये ओवरलोड व अवैध रेतीची रात्र दिवस वाहतुक शेकडो डंपर मार्फत वरुड मार्गे अमरावतीमध्ये जात असल्याची माहीती डॉ. हरी बालाजी, पोलीस अधीक्षक यांना माहिती  प्राप्त होताच अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागात नव्यानेच रुजु झालेले अपर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा यांना काम सोपविण्यात आले होते.

त्यानंतर  सर्व रेतीवाहतूक  तस्करी करणार्यां मार्गाचा आढावा घेवून अपर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा यांनी क्षनाचा विचार न करता सापळा रचुन मध्यरात्रीतुन रेतीची ओवरलोड व अवैधरीत्या वाहतुक करणारे एकून ३५ डंपरसह  ५ खाजगी वाहन सुद्धा जप्त केलेली आहे. या कारवाईत जप्त केलेल्या वाहनासह   एकून मुद्देमालाची  किंमत २० कोटी इतकी आहे . या प्रकरणाची अधिक चौकशी अपर पोलीस अधीक्षक लोढा करीत असून या  कारवाही मुळे अवैधरीत्या रेतीची  वाहतुक करणाऱ्या रेतीतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.