आदिवासी गोवारी समाज बांधवांचे शहीद स्मारकाला अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर,दि,२३ नोव्हेंबर : नागपूर येथे २३ नोव्हेंबर १९९४ रोजी  हिवाळी अधिवेशना दरम्यान आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत असतांना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये ११४ आदिवासी गोवारी शहिद झालेले होते त्यांचा स्मृती दिनानिमित्य आदिवासी गोवारी युनिटी ट्रस्ट नागपूर, आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, आमदार परिणय फुके, सीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्मारकाला अभिवादन करण्यात आले. मोठया प्रमाणात गोवारी बांधव शहीद स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आलेले होते.

हे देखील वाचा,

खाजगी प्रवासी वाहनधारकांना आले सुगीचे दिवस

…आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…

आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भामरागडातील दोन युवक होणार डॉक्टर ; डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी केला सत्कार

आमदार परिणय फुकेमहापौर दयाशंकर तिवारीसीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस