डोंबिवलीत त्या रिक्षा स्टँड वर झालेल्या मारहाणीत सापडली बंदुकीची गोळी!

स्कुटीला कट मारल्या वरून झाला होता वाद.. डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत केली दोघांना अटक. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत झाली कैद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

डोंबिवली, दि. १६ डिसेंबर :  स्कुटी चालकाला कट मरल्याच्या रागातून एका रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला १० ते  १५ जणांनी मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने मारहानी दरम्यान पिस्टल काढताना बंदुकीची एक गोळी त्या ठिकाणी पडली होती. पोलीसांच्या तपासात ही गोळी आढळून आली.

डोंबिवली पूर्व येथून रिक्षा चालक राजेश भालेराव रिक्षा घेऊन जात रस्त्यावरून असताना कट मारण्याच्या कारणावरून स्कुटी चालक सिद्धार्थ मोरे यांच्यात वाद झाला होता. १३ तारखेला रात्री साडे नऊ वाजताच्या  सुमारास सिद्धार्थ मोरे यांनी अमोल केदारे व त्यांच्या साथीदारासह भालेराव यांना इंदिरा चौकात गाठले.अमोल व सिद्धार्थ यानी आपल्या १० ते  १५ साथीदारांसह भालेराव यांना बेदम मारहाण केली.

या मारहानीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. भालेराव यांनी डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता या ठिकाणी त्यांना बंदुकीची गोळी आढळून आली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या प्रकरणी अमोल केदारे व सिद्धार्थ मोरे याना ताब्यात घेतले.

अमोलला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने भांडणादरम्यान आपल्याजवळील पिस्टल काढत असताना आपल्याच पिस्टल मधून गोळी पडल्याचे कबुली दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास करत गुन्हा दाखल करत अमोल केदारे, सिद्धार्थ मोरे या दोघाना अटक केली असून अमोल केदारे यांच्याकडे ही विना परवाना पिस्टल कुठून आणि कशासाठी आणि याचा तपास पोलिसांनी सूरु केला आहे.

हे देखील वाचा : 

बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांचं यश – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क,संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

आजपासून दोन दिवस सरकारी बँक कर्मचारी संपावर; काम प्रभावित होणार

 

 

 

 

lead news