मालेरमाल येथील दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली ११ : चामोर्शी तालुक्यातील मालेर माल येथील दोन विक्रेत्यांकडून ८ हजार ५०० रुपयांची दारू व  मोहफुलाचा सडवा जप्त करून दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केल्याची कारवाई चामोर्शी पोलिस, मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरित्या केली.

मालेर माल येथे मुक्तिपथ गाव संघटना सक्रिय आहे. या संघटनेच्या अथक परिश्रमाने मागील दोन महिन्यांपासून अवैध दारूविक्री बंद होती. परंतु, गावातील महिला व पुरुष मिरची तोडण्यासाठी बाहेर गेल्याने गावातील दारूविक्रेत्यानी संधी साधून आपला अवैध व्यवसाय सुरु केला.

अशातच गावात चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरु असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेच्या महिलांनी पाळत ठेवली होती. दरम्यान चामोर्शी पोलिस, मुक्तिपथ व गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरित्या कारवाई करीत एका महिलेसह दोन विक्रेत्यांकडून ५० लिटर मोहफुलाचा सडवा व ३० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली.

याप्रकरणी दोन्ही विक्रेत्यांवर चामोर्शी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अंमलदार कोसमशिले, शेडमाके यांनी केली. यावेळी गाव संघटन अधक्ष धुर्वे, अरुणा रायसिडाम, विद्या गेडाम, पत्रू इश्टाम व मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे उपस्थित होते.

हे देखील वाचा ,

 

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात ५० लाख सुवासिक फुलांची आरास

महाराष्ट्रात व्याघ्र व्यवस्थापनात वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ ; वनमंत्री मुनगंटीवारांच्या नेतृत्वात वनखात्याची दमदार कामगिरी

https://loksparsh.com/top-news/preamble-of-the-constitution-now-in-primitive-madiya-language/36838/

 

Dr. Abhay Bang