महाराष्ट्रात व्याघ्र व्यवस्थापनात वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ ; वनमंत्री मुनगंटीवारांच्या नेतृत्वात वनखात्याची दमदार कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
महाराष्ट्रातील वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आज ही संख्या चारशेच्या आसपास पोहोचली आहे. त्यातही एकट्या ताडोबा प्रकल्पातच दोनशेहून अधिक वाघ आहेत. उर्वरित वाघ पेंच, बोर, उमेरड-कऱ्हांडला, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री क्षेत्र, गडचिरोली या जंगलांमध्ये असल्याची नोंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने जास्त आहे आणि हे सारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दुरदृष्टीमुळे शक्य झाले आहे.

चंद्रपूर ११ एप्रिल : देशात व्याघ्र व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्राने उत्तम व्यवस्थापन  केल्याने व्याघ्र व्यवस्थापनात  महाराष्ट्र राज्यात  मोठे स्थान प्राप्त केले असून राज्यात मानाचा तुरा रोवला आहे . नुकतेच पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतातील वाघांची संख्या आणि व्याघ्रसंवर्धनात झालेले कार्य संपूर्ण देशासमोर मांडले. भविष्यात अधिक उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने दमदार केली आहे या पुढेही  भविष्यात अधिक उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला..

 महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपाचे सरकार आले होते  त्यावेळी वाघांची संख्या १९० होती. त्यावेळी वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी सूत्रे हाती घेतली आणि सर्वांत आधी वन्यजीव व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. व्याघ्र संवर्धनातून व्याघ्र व्यवस्थापनाचा मार्ग त्यांनी शोधला आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वाघांची शिकार रोखून त्यांचे संवर्धन करणे, त्यांच्या सुरक्षेची हमी देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जंगलांमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. केवळ भारतातीलच नव्हे तर देशाबाहेरील पर्यटकांनाही महाराष्ट्रातील जंगल आकर्षित करतील यासाठी प्रयत्न केले.व्याघ्रसंवर्धनाच्या संदर्भात जनजागृतीचे उपक्रम त्यांनी राबवले. आज २०२३ मध्ये महाराष्ट्रातील वाघांची संख्या चारशेच्या आसपास गेली आहे. त्याचे श्रेय महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धन व व्याघ्र व्यवस्थापनाला जाते.

हे देखील वाचा,

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनविलेल्या ५ हजार किलो मिसळचे मोफत वितरण

मोठी बातमी! शरद पवारांना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द

कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’आणि ‘मदार’ या तीन सिनेमांची निवड

forest minister sudhir munghaPM Narendra Modi