राजस्थानातून धारदार शस्र आणणाऱ्या १० आरोपींना पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

धुळे 24 फेब्रुवारी :- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड या सीमा तपासणी नाका येथून पांढऱ्या रंगाच्या ईरटीका गाडी मधून होणारी धारदार शस्त्रांची वाहतूक रोखली असून, या कारवाईत पोलिसांनी तब्बल १२ तलवारीसह ३ चॉपर आणि एक मारुती कंपनीची ईरटीका गाडी असा सुमारे ६ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही धारदार शस्त्रे राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गाडी क्रमांक MH 04 FZ 2004 मधून काही इसम इंदोर कडून धुळ्याकडे गाडीत ही हत्यारे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्यासह पथकाने हाडाखेड सीमा तपासणी नाका येथे नाकाबंदी करून संशयित वाहनाची तपासणी केली असता या वाहनात तब्बल १२ तलवारी, २ गुप्ती, १ चॉपर, एक बटनाचा चाकू, दोन फायटर इतका मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळून आला आहे.

याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांनी सतपाल गिरधर सोनवणे, किरण नंदलाल दुधेकर, विकास देवा ठाकरे, सखाराम रामा पवार, सचिन राजेंद्र सोनवणे, राजू अशोक पवार, विशाल विजय ठाकरे, संतोष नामदेव पाटील, अमोल शांताराम चव्हाण, विठ्ठल सोनवणे हे सर्व राहणार धुळे तालुक्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हे पण वाचा :-