डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी पितृतुल्य आहेत : आंबेडकरी विचारवंत डॉ. विकास जांभूळकर, नागपूर विद्यापीठ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि. १५ एप्रिल :  आजची स्त्री सुशिक्षित आहे, स्वतंत्र आहे, कमावती आहे तसेच स्वत:च्या हक्काबद्दल सजग आहे, जागरूक आहे, तिला तिचे अधिकार ठावूक आहेत, तिच्या हक्कांसाठी तिला लढता येते, तिच्याविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध तिला दाद मागता येते या अनेक गोष्टींचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.

भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबासाहेब आंबेडकर खरं तर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी ते पितृतुल्य आहेत. असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत डॉ .विकास जांभूळकर, नागपूर विद्यापीठ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा केंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात केले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले, एखाद्या तळागाळातल्या व्यक्तीला आपण वर आणण्याचा प्रयत्न करतो का? जर हे कार्य आपण करत असू तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या कार्यापासून आपण धडा घेतला आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी प्रशांत पुनवटकर आणि शिल्पा आठवले यांनी भीम गीत सादर केली .प्रास्ताविक डॉ. शिल्पा आठवल्ये , संचालन डॉ. रूपाली अलोणे तर आभार डॉ.प्रिया गेडाम यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

19 एप्रिल पर्यंत राज्यात भारनियमातून सामान्य स्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे आपला प्रयत्न – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की – डॉ. दिनकर खरात

मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन एकाचा खुन तर एकजण गंभीर

 

lead news