विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह तातडीने सादर करा – सहाय्यक आयुक्त्यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ३१ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेचे बोर्ड लिस्ट नुसार पात्र विद्यार्थ्यांचे सन २०१८-१९ ते २०२१-२२ मधील बोर्ड यादीनुसार पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव अजुनही विद्यालयांकडूनआवश्यक कागदपत्रांसह या कार्यालयास प्राप्त झाले नाही.

तरी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सर्व आवश्यक कागदपत्रासह लवकरात लवकर या कार्यालयास सादर करण्यात यावेत. विद्यार्थी लाभापासून वंचीत राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा : 

टीईटी परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड

बल्लारपूर औद्योगिक नगरीत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढला उपद्रव!

येत्या फेब्रुवारी महिन्यात ८ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन

 

 

 

Gadchirolilead news