उपविभागीय प्रयोगशाळा अहेरीत सामूहिक राष्ट्रगीत घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव केला साजरा 

पाणी तपासणीचे महत्व व गरज यावर विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. १८ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य उपविभागीय प्रयोगशाळा अहेरी येथे सामूहिक राष्ट्रगीत घेऊन विद्यार्थ्यांना पाणी तपासणी चे महत्व व गरज यावर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात पिण्याचे पाणी नमूणे तपासणी करून पाणी पिणे आता आरोग्यदृष्ट्या गरजेचे आहे आणि रासायनिक व जैविक घटक किती प्रमाणात पाण्यात असावे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमात उपविभागीय प्रयोगशाळा अहेरी चे रसायनी सुमेघा कांबळे, अणुजैविक तज्ञ धनंजय कुमरे व प्र.शा.सहायक जुगल बोम्मनवार तसेच अहेरी येथील विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे यांची शहीद बाबुराव शेडमाके माध्य. विद्यालयात सदिच्छा भेट व विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण.

मृत्यूचा तांडव करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

कसरत करून पायपीट करत प्रशासन पोहोचले मरकटवाडीत. 

 

Laboratory testing sub division Aheri