12- गडचिरोली-चिमुर (अज) लोकसभा मतदार संघ निवडणूक 20 मार्चपासून नामनिर्देशन स्विकारणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली,19 मार्च- भारत निवडणूक आयोगाने 12- गडचिरोली-चिमुर (अज) लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानूसार लोकसभा निवडणूकीची सुचना दिनांक 20 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून दिनांक 20 मार्च 2024 ते दिनांक 27 मार्च 2024 (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, 12- गडचिरोली-चिमुर (अज) मतदार संघ, जिल्हा नियंत्रण कक्ष, पहिला मजला (जुने नियोजन भवन), जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 28 मार्च 2024 ला सकाळी 11.00 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची वेळ दिनांक 30 मार्च 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत असून दिनांक 19 एप्रिल 2024 ला मतदान घेण्यात येईल. मतदानाची वेळ पुढीलप्रमाणे राहील.

66-आमगांव (अज) वि.स.नि.क्षेत्र- सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 67- आरमोरी (अज) वि.स.नि.क्षेत्र- सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 68- गडचिरोली (अज) वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 69- अहेरी (अज) वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 73- ब्रम्हपूरी वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते सायं. 06.00 पर्यंत, 74-चिमुर वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते सायं. 06.00 पर्यंत, मतमोजनी दिनांक 04 जून 2024 ला होईल.
वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.