गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेत महत्त्वपूर्ण विषयी मार्गी ४१३२.१२ लक्ष च्या अर्थसंकल्पास मंजुरी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली,15 मार्च :१२ मार्च रोजी अतिशय खेळीमेळीच्या च्या वातावरणात गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक सुरू झाली. या सभेत सुरुवातीला व्यवस्थापन परिषदेची निवडणूक आणि त्यानंतर मागील वर्षीचे आर्थिक लेखे पारित करून २०२३-२४ चा ४१३२.१२ लक्षाचा अर्थसंकल्प विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला वंदन करून सादर केला. अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दिवसभराचे कामकाज झाल्यावर ही अधिसभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर १४ मार्च ला सकाळी ११.३०वा. अधिसभेला सुरवात झाली.या वेळी एका तासाच्या चर्चेनंतर अर्थसंकल्पास सर्वानुमते मान्यता प्रदान करण्यात आली.
२०२३-२४च्या अर्थसंकल्पातील आगम रू ४१३२.१२लक्ष आणि शोधन रू ५२२१.८४लक्ष राहणार असून तूट १०८९.७२ लक्ष राहील.

सन २०२३-२०२४ च्या मुळ अर्थसंकल्पातील वैशिष्टय म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शुल्कामध्ये वाढ न करता विद्यार्थीभिमुक असा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला असुन अर्थसंकल्पातील तुट कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर अर्थसंकल्पातुन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) ची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीस चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विद्यापीठाद्वारे शासनाचे विविध उपक्रम, योजना व प्रकल्प राबवुन विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी व व्यक्तीचा सर्वागिण विकास करण्याचे ध्येय समोर ठेवून विद्यापीठ लोकाभिमुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्या दृष्टिने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकासाचे उद्दिष्टे ठेवून सन २०२२-२३ चे सुधारित व २०२३-२४ च्या मूळ अर्थसंकल्पात विद्यार्थी, शिक्षक
व महाविद्यालयाच्या विकासाकरीता या नविन योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत.

• विद्यापीठ वसतीगृहातील विद्यार्थ्यांना फूड सबसिडी – ५०लाख
• विद्यार्थी वार्षीक स्नेहसंमेलना साठी -१०लाख
• क्रिडा अकॅडमी साठी -५० लाख

विद्यार्थी विकास विभागाच्या विविध योजना

• विर बाबुराव शेडमाके (कमवा व शिका) योजना – ६० लाख

• विद्यार्थ्यांना सेमीनार, कॉन्फरन्स, वर्कशॉप साठी – १० लाख

• विद्यार्थी औद्योगिक व शैक्षणिक सहल (५०% सवलत) – ५० लाख

पीएच. डी. संशोधन फेलोशिप साठी- ५०लाख
• पोष्ट पीएच. डी. संशोधन फेलोशिप खर्च-५० लाख
• विद्यार्थी बौध्दिक संपदा खर्च- ३० लाख
• विद्यार्थ्यांकरीता संशोधन प्रकल्प -५० लाख
• विद्यार्थ्यांकरीता सुसज्य उपहारगृह खर्च-०१लाख

विद्यार्थी कौशल्य विकास खर्च (चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी, चिमुर, कुरखेडा, वरोरा) ५० लाख

• विद्यार्थी साहीत्य संमेलन योजना खर्च-१० लाख

• विद्यार्थी ऑनलाईन प्रोग्राम/कोर्सेस प्रतीपुर्ती योजना खर्च -३०लाख

विद्यार्थी व शिक्षक शोध आलेख मदत खर्च (Scopus Publication)-५० लाख

अध्यासन केंद्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी- १५ लाख

• वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता अध्यासन केंद्र – १५ लाख

• आदिवासी अध्यासन केंद्र- १५ लाख
• जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र-१५ लाख
• एकात्म मानवतावाद अध्यासन केंद्र-१५ लाख

विद्यापीठाच्या २०२१-२२चा वार्षिक अहवाल विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव यांनी सादर केला. यालाही सर्वांनुमते मान्यता प्रदान करण्यात आली. यानंतर प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. यामध्ये गोंडवाना विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव होता या प्रस्तावाला सदस्यांनी अनुमोदन दिले आणि हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. विद्यापीठात स्पर्धा परीक्षांसाठी अद्यावत आणि उन्नत असे वाचनालय तयार करण्यात यावे असा प्रस्ताव होता तसंच यात नेट सेटचे वर्गही सुरू करण्यात यावे अशी अतिशय चांगली सूचना होती यावर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी समिती गठीत करण्यात येईल असं सांगत या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संशोधन व नवो उपक्रमाला चालना देण्याकरिता विद्यार्थी कल्याण योजना, विद्यार्थी सहाय्यता योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव होता आणि या प्रस्तावाला मान्यता देत हा प्रस्ताव कुलगुरू महोदयांनी पारित केला. यावेळी विद्यार्थी विकासाबाबत अनेक प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी सदैव सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ही अधिसभा संध्याकाळी ७ला संपली.

हे पण वाचा :-