“येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक मंजूर करा” – राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर

पुढच्या अधिवेशनात महिलांना शक्ती देणारे शक्ती विधेयक मंजूर करावे यासाठी सरकारकडे आग्रह करणार असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ९ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’  हा उपक्रम आज दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.

हा उपक्रम वेळ आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आयोजित केला असल्याची प्रतिक्रिया अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रपुरात दिली.

राज्यात बालविवाह आजही होत आहेत. मात्र गाव स्तरावर ज्या ग्रामपंचायतीत अशी विवाह नोंदणी झाली ते लोकप्रतिनिधी आणि विवाह नोंदणीकार यांचेवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस महिला आयोग राज्य सरकारला करणार असल्याचे चाकणकर म्हणाल्या.

कोरोना काळात कौटुंबिक हिंसा वाढली असून पोलिसांनी भरोसा सेल- दामिनी पथके- हेल्पलाईन नंबर  भक्कम करा असे निर्देश यंत्रणेला दिले. येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक मंजूर करा असा आग्रह सरकारकडे करणार असून यामुळे महिला अत्याचार प्रकरणात विहित काळात तपास आणि शिक्षा शक्य होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

आयोग आपल्या दारी उपक्रमात सर्व संबंधित अधिकारी एकाच जागी येत आहेत. निर्णयाना गती मिळत आहे असे सांगत चंद्रपुरात ३३ प्रकरणात  सुनावणी होत ३ समझोत्याने निकाली निघाल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

भिमा कोरेगांव शौर्यदिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

हेलिकॉप्टर दुर्घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

तीन गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह दोघांना अटक…