पेपरमिल वसाहतीमध्ये बिबट्याचा हल्ल्यात महिला जखमी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर : आज सकाळच्या सुमारास आष्टी पेपरमिल मध्ये बिबट्याचा हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे.

आज सकाळी ७.४५ चे दरम्यान बबीता दिलीप मंडल वय ४२ ही पेपरमील वसाहती मधील इ /४३ क्वाटर मध्ये भांडे घासत असतांना बिबट्याने हल्ला करुन तिच्या गळ्याला पकडले तेव्हाच तिचा मुलगा कुनाल धावुन आला व बिबट्याच्या तावडीतून सोडविले त्यामुळे तिचे प्राण वाचले.

जखमी महिलेला आष्टी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

आष्टी परिसरात या पूर्वी ही बिबट्याच्या हैदोस वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना जिवमुठीत राहून जगावे लागत आहे.