कळंबच्या समुद्रात अडकली  कार

अतिउत्साही पर्यटकांना अडवणार कोण ?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, 1 ऑक्टोबर :-  समुद्र किनारी किंवा गड किल्ल्यावर, अथवा धबधब्याच्या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी जाणे पर्यटकांना नेहमीच आवडते. परंतु काही वेळेला हा अतिउत्साहीपणा जीवावर बेततो किंवा नुकसानीस कारणीभूत ठरतो. असाच एक प्रसंग काल वसईतील कळंब समुद्र किनारी घडला. एक पर्यटक आपली हुंडाई कंपनीची चारचाकी गाडी थेट सुमुद्रात घेऊन गेला. परंतु ही गाडी समुद्रातील वाळूत अडकल्याने बाहेर येत नव्हती. शेवटी स्थानिक नागरिक आणि जीव सुरक्षा दलाच्या जवानांच्या सहाय्याने सदर गाडी समुद्रातून बाहेर काढण्यात यश मिळाले.

खोल समुद्रात जाऊ नका. नको ती रिस्क घेऊ नका अशी सतत सूचना देऊनही अतिउत्साही पर्यटक ऐकत नाहीत. त्याचा त्रास विनाकारण स्थानिक नागरिक आणि कर्तव्यावर असणाऱ्या जीव रक्षक जवानांना होतो. यासाठी पर्यटकांनी मजा जरूर करावी पण आपले नुकसान इतपत ती करू नये याची खबरदारी घ्यावी.

हे देखील वाचा :-

 

Car stuckin Kalamb sea