बोरी केंद्रात निपुण भारत उद्बोधन वर्ग शिक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 6 ऑगस्ट :-  निपुण भारत उद्बोधन द्वारा पंचायत समिती अहेरी च्या बोरी केंद्रा अंतर्गत आज दि.6 ऑगस्ट रोजी एक दिवसीय वर्ग शिक्षक प्रशिक्षण केंद्र शाळा बोरी येथील सभागृहात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त असणारं शैक्षणिक वातावरण निर्मीती करणे हा हेतु पुढे ठेवुन, या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख प्रफुल्ल मंडल तर प्रमुख पाहुणे म्हणून बीआरसी अहेरीचे विषेश साधन व्यक्ती किशोर मेश्राम हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी अनिके महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले, जसे वय वर्ष तीन ते सहा वयोगटातील मुले हे अंगणवाडीत प्रवेश घेतल्या नंतर त्याना पाच वर्षा अखेरीस अपेक्षित कोणकोणत्या क्षमता प्राप्त करायला हव्या, त्याचप्रमाणे मुल इयत्ता पहिलीत येण्याअगोदर त्यांनी काय शिकायला हवे व शाळापूर्व तयारीत अंगणवाडी ताईची भुमिका काय असावी याविषयीचे मार्गदर्शन केंद्र प्रमुख प्रफुल्ल मंडल यांनी केले. तसेच, निपुण भारत अभियानाची गरज,महत्त्व व शासनस्तरावर होत असलेले प्रयत्न, तसेच साक्षरता अभियान अंतर्गत भाषा व गणित या घटकांवर लक्ष केंद्रित करुन साध्य करायचा हेतू काय असावा या बाबतही मार्गदर्शन केले.
याचप्रमाणे शाळापूर्व तयारी अंतर्गत विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल,विज्ञान प्रवेश स्वरुप व अंमलबजावणी,अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा वापर,पायाभूत शैक्षणिक कौशल्य आत्मसात करने या सर्व बाबतीत अंगनवाडी सेविका व शिक्षकाची भुमिका याविषयी प्रशिक्षण वर्गाचे सुलभक किशोर मेश्राम,राजेश गड्डम,लक्ष्मीनारायण येरकलवार,लक्ष्मी कुसराम यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी उपस्थित शिक्षकांना निपुण प्रतिज्ञा मुक्तेश्वर वनकर यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन संतोष नलगुंटा यांनी केले तर उपस्थितांचे आभार रविंद्र येमसलवार यांनी मानले. या उद्बोधन वर्ग प्रशिक्षण केंद्रात मोठया संख्येने अंगणवाडी सेविका, शिक्षक व मुख्याध्यापकांनी उपस्थिती दर्शवली आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

हे देखील वाचा :-

धक्कादायक बातमी
मदतीचा हात देऊन महिलेचा घात, 24 तासात दोनदा अत्याचार

मदतीचा हात देऊन महिलेचा घात, 24 तासात दोनदा अत्याचार