मदतीचा हात देऊन महिलेचा घात, 24 तासात दोनदा अत्याचार

पीडित महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भंडारा 6 ऑगस्ट :-   

पतीसोबत विभक्त पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. पतीसोबत विभक्त झालेल्या गोंदियातील सावरटोली येथील 35 वर्षीय महिलेवर मदतीच्या बहाण्याने दोनदा सामुहिक अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत.

पीडित महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी असून ३० जुलै रोजी घरगुती वादातून ती घराबाहेर पडली. माहेरी जाण्यासाठी निघाली असता वाटेत श्रीराम उरकुडे (वय 45, रा. गोरेगाव) हा इसम तिला भेटला. त्याने तिला गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर 31 जुलै रोजी पुन्हा तिच्यावर अत्याचार करून पळसगाव येथील जंगलात सोडून दिले. ती भटकत असताना 1 ऑगस्ट रोजी भंडारा शहराजवळील कान्हालमोह येथील धर्मा ढाबा येथे आली. तेव्हा एक व्यक्ती तिच्याजवळ आला. ‘घरी सोडतो,’ असे म्हणाला; पण महिलेला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने विश्वास दिल्यावर महिला त्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून निघाली, पण दोघांनीही तिला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करून त्या महिलेला तिथेच सोडून दिलं.

02 ऑगस्ट रोजीच्या सकाळी सदर महिला विवस्त्र अवस्थेत स्थानिकांना शेतात आढळली. पीडितेला पाहिल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं. महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करायला कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशीदेखील चर्चा केल्याचं समजतं आहे. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही, हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत. एकूणच या प्रकरणावरून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

निर्भया प्रकरण, शक्ती मिल किंवा साकीनाका बलात्कार प्रकरण यानंतर भंडारा प्रकरण, अशा अनेक नराधमांवरती आम्ही कारवाया करतो, कठोर शिक्षा देतोय, तरीदेखील घटना कायम घडतच आहेत. याला जबाबदार कोण? शासन, शासनाचे ढीले नियम की आणखी कोणी? त्यामुळे आता शासन जरी बोलत असलं की कठोर कारवाई करू, योग्य ती शिक्षा देऊ, तर मग घटना घडतात कशा आणि तेवढी या नराधमांची हिम्मत होते कशी, असे अनेक प्रश्न आता समोर येऊ लागलेत. त्यामुळे आता या प्रकरणावर कधी आणि किती कठोर कारवाई होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलाच दिसून येतंय.

हे देखील वाचा :-

bhandar policebhandarabhandara gag rape case