शेतकरी गटांना कृषी अवजारे योजनेचा मिळणार लाभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३० एप्रिल: कुरखेडा-मानव विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकरी गटांना विविध उपकरणे उपलब्ध करूनदेण्याची योजना आहे कुरखेडा तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कुरखेडा तथा निवड समिती सचिव सुरभी बाविस्कर यांनी केले आहे.

सन-२०२०-२१ या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकरी गटांना विविध उपकरणे उपलब्ध करून देण्याचे योजनेत राईस डी हासकिंग मशीन, भात झोडणी यंत्र, बहुपीक टोकण यंत्र तथा भाजीपाला रिजर व कोळपे, ताडपत्री पॅकिंगसह, स्वयंरोजगार किट, हस्त चलित कडबा कट अडकित्ता इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता कुरखेडा तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे.तरी तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी, शेतकरी कंपन्यांनी, महिला शेतकरी बचत गटांनी, सेंद्रिय शेतीबचत गट यांनी विहित नमुन्यातील अर्जदिनांक १२ मे २०२१ पर्यंत तालुका कृषी अधिकारी, कार्यालय कुरखेडा यांच्याकडे सादर करावे.

या योजनेत राईस डी हासकींग, भात झाडणी यंत्र, बहुपीक टोकण यंत्र तथा भाजीपाला रिजर व कोळपे, ताडपत्री पॅकिंगसह, स्वयंरोजगार किट, हस्त चलित कडबा कट अडकित्ता इत्यादी शेती अवजारे चा समावेश आहे. या योजनेकरिता ९०% अनुदान देण्याची योजना असून १०% शेतकरी गटाचे लाभार्थी हिस्सा असेल.

अर्जाचा नमुना तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे उपलब्ध आहे. ही योजना केवळ अनुसूचित जमातीच्या गटाकरिता आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नोंदणीकृत शेतकरी गटांनी घेण्याचे आवाहन निवड समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी, कुरखेडा सुरभी बाविस्कर यांनी केले आहे.

farmer