गडचिरोली जिल्ह्यात आज 11 कोरोनामुक्त तर 12 कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,दि.28:- आज गडचिरोली जिल्हयात 427 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 12 असून कोरोनामुक्ताची संख्या 11 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37714 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36889 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 50 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.81 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.13 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये मुलचेरा तालुक्यातील 11,कोरची तालुक्यातील 01,जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, आरमोरी तालुक्यातील 01, व चामोर्शी तालुक्यातील 03, मुलचेरा तालुक्यातील 03,वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा :-

.. पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार…

gadchiroli covid