11 नोव्हेंबरला येणार ‘गोदावरी’ प्रेक्षकांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला ट्रेलर लाॅंच
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 31 ऑक्टोबर :-  ‘गोदावरी’ हा सिनेमा प्रत्येक कुटूंबाला जोडणारा सिनेमा आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या महत्वाच्या भुमिका असून हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारआहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकल्यानंतर ‘गोदावरी’ सिनेमा आता सिनेगृहात प्रदर्शित होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच गोदावरी सिनेमाचा ट्रेलर लाॅंच झाला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘गोदावरी’ सारखा सिनेमा केल्याबद्दल जितेंद्र जोशीचे अभिनंदन. गोदावरीशी नात सांगणारा हा एक सुंदर सिनेमा आहे. संस्कृती आणि सभ्यता याचा थेट संबंध नदी आहे. पण मधल्या काळात आपल्या नद्या आणि आपले विचारही प्रदूषित झाले आहेत. यात श्रध्दा आणि अंधश्रध्द दोन्ही नाही. गोदावरी हा सिनेमा नदी भोवती फिरतो. तसेच एका व्यक्तीची कहाणी गुंफून एक चांगला आश्य देण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

‘गोदावरी’ सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. इफ्फी 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महानजन यांनी पटकवला आहे. न्यूयाॅक इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये गोदावरी या सिनेमाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आला आहे. वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये वल्र्ड प्रीमीअर आणि न्यूझीलंड इंटनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये एशिया पॅसिफिक प्रीमिअर ही दाखवण्यात आला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचि.करणाच्या पुरस्कारने गौरविण्यात आले.

हे देखील वाचा :-

'Godavari'film