पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कायदा-सुव्यवस्था स्थितीबाबत आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 चंद्रपूर, दि. ५ मार्च  : शहर-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था स्थितीबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालयात एक आढावा बैठक घेतली. काँग्रेस नेते- नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर कायदा सुव्यवस्थेबाबत नकारात्मक चर्चा केली जात होती.

या बैठकीत आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

चंद्रपूर शहर व बल्लारपूरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे नियंत्रण अधिक निधी देत पोलिसांच्या माध्यमातून केले जाण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले. शासकीय कर्मचारी व राजकीय नेते यांच्यावरील हल्ल्याबाबत पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी असे सांगत नागरकर यांच्यावरील आरोपींना त्वरेने शोधून शासन करण्याबाबत पोलिसांना निर्देशीत केले.

हे देखील वाचा : 

“मेट्रोच्या अर्धवट कामाच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणा” शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, 6 तासांसाठी युद्धविराम घोषित

 

 

lead newsVijay Wadettiwar