पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि.23 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता सिंदेवाही येथे आगमन व आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे आयोजित महाआरोग्य मेळाव्यास उपस्थिती. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह येथे सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यात हिंस्र वन्यप्राण्यांमुळे नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाची आढावा बैठक. दुपारी 12.30 वा. सिंदेवाही येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व पक्षाच्या प्रमुखांसोबत चर्चा. सायंकाळी 6 वा. ब्रह्मपुरीयेथून गडचिरोलीकडे प्रयाण.

रविवार, दि. 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वा. सावली येथे आगमन व सावली येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. सावली येथून बल्लारपुरकडे प्रयाण. दुपारी 12 वा. बल्लारपुर येथे आगमन व जनता विद्यालय, येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12.45 वा. चंद्रपूर येथे आगमन व मातोश्री सभागृह, चंद्रपूर येथे सोनार समाजाच्या वधू-वर मेळाव्यास उपस्थित. सायंकाळी 4 वा. नकोडा (घुग्गुस) येथे आगमन व एसीसी विजय क्रांती कामगार युनियनच्या वतीने आयोजित कामगार मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वा. मोरवा येथे आगमन व नागरीक सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.30 वा. राधाकृष्ण सभागृहासमोर ऊर्जानगर रोड, चंद्रपूर येथे आगमन व तुळशीनगर विकास समितीच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7:30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

सोमवार दि. 25 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृह येथे चंद्रपूर जिल्ह्यातील 11वी व 12वी सायन्स मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याबाबत संबंधितांची बैठक तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी दोन डिजिटल क्लासरूम तयार करणेबाबत बैठक. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्ह्यातील क्रीडा विभागाच्या विकास कामाबाबत जिल्हा क्रीडा समितीची आढावा बैठक. दुपारी 1.15 वा. मनरेगा बाबत संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक. दुपारी 2 वा. मध्य चांदा वनविभागाच्या वतीने श्यामाप्रसाद मुखर्जी जनधन योजनेअंतर्गत मायक्रोप्लॅन तयार करणे, यासह वनविभागाच्या विविध विकास कामांबाबत आढावा बैठक. दुपारी 3 ते 3.30 पर्यंतचा वेळ राखीव. सायंकाळी 4 वा. चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

lead newsmVijay Wadettiwar