नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट चंद्रपूर ४३ पार तर नागपूर ४१.९

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ३१ मार्च: नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांत तीन दिवसांत उष्णतेची लाट येणार असून पुढीत दोन दिवसांत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत उष्णतेची लाट पसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  

नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा बसत असून मंगळवारी चंद्रपूर येथे ४३.९ तर नागपूर येथे ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानकडून उष्ण हवा येण्यास सुरुवात झाल्यामुळे विदर्भातील तापमानातही वाढ होऊ लागली आहे. पुढील तीन दिवस चंद्रपूर, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी नागपूरच्या तापमानात ०.४ अंशांनी वाढ झाली असून पारा ४१.९ ” वर पोहचला आहे.

Vidarbha Temeperature