क्रांतिवीर बाबुराव पुलेसुर शेडमाके हे स्वातंत्र्य चळवळीतील एक महान योद्धा आहेत

- माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

अहेरी, दि. २९ डिसेंबर : या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यापैकीच एक आपल्या क्षेत्रातील थोर क्रांतिकारी वीर बाबुराव पुलेसुर शेडमाके असून त्यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरुद्ध सहस्त्र उठाव केला.युद्धाच्या वेळी इंग्रजांच्या सेनेला त्यांनी जंगजंग पछाडले.त्यांनी इंग्रज राजवटीसमोर कधीही आपले गुडघे न टेकता इंग्रजांसोबत घडलेल्या प्रत्येक युद्धात इंग्रज फौजांना अस्मान दाखवित ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक महान योद्धा ठरल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.

ते अहेरी तालुक्यातील दिनाचेरपल्ली येथे कोया पूनेम, गांगरा पहांदीपारी कुपारलिंगो तथा क्रांतिवीर बाबुराव पुलेसुर शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी गोंडी धर्म संमेलनाचे उदघाटक म्हणून बोलत होते.

या गोंडी धर्म संमेलनाला अध्यक्ष म्हणून सरपंच रेणुकाताई आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार ,अहेरीचे नगराध्यक्षा रोजा करपेत,नगरसेविका नौराज शेख, माजी जि.प.सदस्या सुनीताताई कुसनाके,सहायक प्रशासन अधिकारी सत्यनारायण कोडापे,प्राध्यापक रमेश हलामी, महेश मडावी,उपसरपंच उमा मडगुलवार, माजी सरपंच श्रीनिवास आलाम, ग्राम पंचायत सदस्य मधुकर आत्राम,प्रकाश तलांडे,महेंद्र इष्टम,श्रीहरी आलाम आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांना हुलकावणी देण्यासाठी अनेक आदिवासी योध्दानीं आपल्या प्राणाची बलिदान दिले.यात झारखंडमधल्या भगवान बिरसा मुंडा असो आंध्रप्रदेशातल्या कोमरम भीम, बिहार मधल्या शंकर शहा, रघुनाथ शहा,रामशाह, वेंकटेश शेडमाके असे अनेक थोर क्रांतिकारकांची समावेश असून यात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे वीरगाथा हे नेहमीसाठी आपल्या सर्वांमध्ये अजरामर राहणार असल्याचे त्यांनी म्हंटले.

सदर संमेलनात माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, सहाय्यक अधिकारी सत्यनारायण कोडापे आणि प्राध्यापक रमेश हलामी यांनी गोंडी धर्म आणि क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनपटलावर प्रकाश टाकले. 

या समारंभाचे प्रास्ताविक भूमक सुंदरशाय शेडमाके यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रकाश तलांडे यांनी मानले.

या गोंडी धर्म संमेलन आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळा अनावरण समारंभाला आदिवासी बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.

हे देखील वाचा : 

विदर्भ मजबूत तर, राज्य मजबूत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग सुरू करा

 

 

 

AheriEx MLA Dipak Atram