माणगाव पोलिसांनी बिबट्या ची नखे विकणारी टोळी केले गजाआड.

वनविभाग व माणगांव पोलिसांची संयुक्त कारवाई.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रायगड 25 सप्टेंबर :-  रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात वनविभाग व माणगांव पोलिसांची संयुक्त कारवाई करत बिबट्या ची नखे विकणारी टोळी केले गजाआड. वन्यजीवांची हत्या करून अवयवांची तस्करी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. असाच प्रकार माणगाव तालुक्यात घडला आहे बिबट्याच्या नखांची विक्री करीत असताना ऐका टोळीतील ४ आरोपी व १० नखे बिबट्याची वनविभाग माणगांव व माणगांव पोलिसांनी गजाआड केली.

माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील कुंभार्ते गावच्या हद्दीत पोलीस व वनविभाग यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार ही संयुक्त कारवाई करण्यात आली. आरोपी मंगेश लक्ष्मण कुर्मे , नईम अजीज शेख, दत्ता पवार, मंगेश पवार यांना १० नखे बिबट्या ची विकत असताना वनविभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडून गजाआड कले. त्याच्यावर वन्य जीव संरक्षण कायदया नुसार गुन्हा नोंदवीण्यात आला आहे.

हे पण वाचा :-

ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे,  सरकारने यांना वेळीच ठेचल पाहिजे – राज ठाकरे यांचा हल्लाबोल

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर