आता दहावीपर्यंत ‘व्हॉट्स अप’ स्वाध्याय – शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) व ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ च्या वतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू केला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. १२ डिसेंबर: राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्याथ्र्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ‘स्वाध्याय’ (डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्याथ्र्यांकडे उपलब्ध असणाऱ्या मोबाइलवर ‘क्विझ’ (प्रश्नमंजूषा) पाठवण्यात येत आहे. त्याच्यातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्याथ्र्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळत आहे.कोरोनामुळे शाळा सात महिन्यांपासून बंद असल्याने विद्याथ्र्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एका स्मार्ट फोनद्वारे १०० विद्यार्थी व्यग्र राहू शकतात. ज्या विद्याथ्र्यांकडे म्हणजेच त्यांच्या पालकांकडे ‘स्मार्ट फोन’ नाहीत, तेही या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) व ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ च्या वतीने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक विद्याथ्र्यांपर्यंत शालेय शिक्षण विभागाचे कार्यक्रम व उपक्रम पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अधिकाNयांना शिक्षण मंत्र्यांनी केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विद्याथ्र्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे सांगण्यात येते. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून, येत्या काही दिवसांत उर्दू माध्यमही सुरू केला जाणार आहे, असे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

( हे सुद्धा वाचा बालाघाट मधील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यातील जहाल महिला नक्षली ठार)

Anil Deshmukhsupriya suleVarsha Gaikwad