लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. २० फेब्रुवारी : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी – आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदिघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मृतक मुलाचे नाव अभिनव दौलतराव कुथे (२३) असे असून तो आरमोरी येथिल रहिवासी आहे. अभिनव आपल्या आईसह आरमोरी येथून नदिघाट पुलाजवळ वैनगंगा नदीपात्रात आंघोळ करायला आला होता. आई सुद्धा नदी पात्रात थोड्या पाण्यात उभी होती. मुलगा अभिनव हा खोल पाण्यात पोहायला गेला. गेले दोन दिवस वैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असुन पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिनव काही क्षणातच वैनगंगा नदी पात्रात दिसेनासा झाला.
यासंबंधी पोलिसांना घटनेची माहिती दिली असून आपत्ती व्यवस्थापन दल सदस्यांसह यंत्रणांनी प्राथमिक शोध मोहीम सुरू केली आहे.
हे देखील वाचा :
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा